नागपूर: येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज बुधवार अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना महाविकास आघाडीला धारेवर धरले. यावेळी त्यांनी शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत बनविलेल्या सरकारवर देखील टीका केली. बाळासाहेबांनी राज्यातून कॉंग्रेसचा विचार नष्ट करण्यासाठी चंग बांधले होते. त्यांनी कॉंग्रेसच्या एका नेत्याच्या थोबद्यात चप्पल मारली होती, मात्र ज्यांच्या थोबाडात बाळासाहेबांनी चप्पल मारली त्यांच्यासोबतच शिवसेनेने सरकार बनविले, हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट असल्याचा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.
वाघाला पकडण्यासाठी सापळा रचला जातो, त्या सापळ्यात वाघ अडकल्याचा चिमटा देखील मुनगंटीवार यांनी काढला.