ज्याच्या बरोबर तेली तो सदा भाग्यशाली -पवनपाल महाराज

0

चुंचाळ्यात संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त कीर्तन

चुंचाळे- श्री समर्थ वासुदेव बाबा चौकात तेली समाज बांधव व ग्रामस्थांच्यावतीने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पवनपाल महाराज यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी पवनपाल महाराज म्हणाले की, ‘ज्याच्या बरोबर तेली तो सदा भाग्यशाली’. वृद्धाश्रम काढण्यापेक्षा ते बंद व्हायला हवे, असे सांगून ते म्हणाले की, असे झाल्यानंतरच समाजात सुधारणा घडून येईल. मला महाराज व्हायचे नाही कारण महाराजांची अवस्था काय आहे तुम्ही पाहत आहात. प्रबोधन आता डिजीटलायझेशनकडे वळले आहे. मोबाईलचा वापर सदगुणांसाठी करा, जुनी संस्कृती आपण विसरत असून ग्रामगीतेतील एक-एक ओवी समाजसुधारणेचे खुप मोठे शस्र आहे. सर्व संताचा सार हा ग्रामगीतेत आहे तर मुलगी हीच खरी घराघराची भाग्यविधाता आहे तसेच या देशाचे पोट म्हणजे किसान तर पाठीचा कणा म्हणजे जवान असे प्रबोधन पवनपाल महाराज यांनी. काळ बदलला, प्रत्येक गावात नाला खोलीकरण, पाणी आडवा पाणी जिरवा राबविले गेले पाहिजे, गावातील जातीयवाद नष्ट व्हायला पाहीजे, गावात शेततळे करा, गावात स्वच्छता करा, दारुबंदी करा असेही आवाहनही त्यांनी केले.

यांची होती कीर्तनास उपस्थिती
शनिवारी वासुदेव बाबा मंदिराजवळ रात्री 9 ते 12 वाजता प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्त खंजिरी वादक प्रबोधनकार पवनपाल महाराज (आकोट) यांचे कीर्तन झाले. तेली समाज बांधव व ग्रामस्थांनी उपक्रमाचे आयोजन केले. गतशील शेतकरी मोहन ओंकार पाटील यांचे चिरंजीव डॉ.भरत पाटील यांना कन्यारत्न व सरपंच कीर्ती पाटील यांना पुतणी झाल्याले गावात प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम झाला. प्रतिमा पूजन विकासोचे माजी चेअरमन सुनील नेवे यांनी केले तर माल्यार्पण सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन वढोदा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनवणे, बोराळे उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत, तंटामुक्ती अध्यक्ष धनसिंग राजपुत यांनी केले. यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील, सुनील नेवे, संदीप सोनवणे, संजय पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ कोळी, ग्रामपंचायत सदस्य अनिल कोळी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठ्ठल राजपूत, वि.का.सो.संचालक ज्ञानेश्वर पाटील, जुम्मा तडवी, हेमंत सावकारे, कलिदंर तडवी यांच्यासह गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तेली समाज बांधव व एकता फाऊंडेशनच्या सदस्य ग्रामस्थांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन भरत चौधरी तर आभार चंद्रकांत चौधरी यांनी मानले. त्यांना साथसंगत हार्मोनियम सुनील गायनकर, तबला वादक रुपेश खेडकर, संगत प्रवीण वाघ, सुखदेव चिचवडकर यांनी दिली.