ज्यादा पैसे घेवून दाखल्यांची प्रिंट

0

जळगाव । पोलिसअधीक्षक कार्यालयातून मिळणारे चारीत्र्य पडताळणीचे दाखल्याचे काम चक्क एका खासगी सायबर कॅफेवर होत असल्याचे शुक्रवारी आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. या संदर्भात पोलिसांनी संबंधित सायबर कॅफेवर छापा मारून शेकडो प्रमाणपत्रे जप्त केले होते. याच पाठोपाठ ऑनलाईन पद्धती झाल्याने चारीत्र्य पळताणी दाखले तत्काळ मिळणे अपेक्षीत आहे, मात्र केवळ डीजीटल सिग्नीचर (स्वाक्षरी) साठी उमेदवारांची अडवणुक करुन 500 ते हजार रुपयांची लूबाडणूक झाल्याची गंभीर बाब सामोर आली आहे. तसेच जिल्हा विशेष शाखेतर्फे दिल्या जाणार्‍या या दाखल्यावंर युक्त फौजदारातर्फे थेट या खासगी सायबर कॅफेत पाठवण्यात येवुन तेथे तत्काळ दाखल्यासाठी हजार रुपयांपर्यंत अतिरीक्त रक्कम वसुल गेल्याची बोंब उठली आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे.

त्वरीत दाखला हव्यास पाठविण्यात येत होते सायबर कॅफेत
निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी, महामंडळावरील बस कंडक्टर, चालक, कुठल्याही शासकीय नोकरी साठी किंवा, परमीट धारक वाहनासाठी संबधीत उमदेवाराचे चारीत्र्य पळताणी आवश्यक अत्त्यावशक असते, त्या शिवाय कुठलेच अर्ज स्वीकारले जात नाही. चारीत्र्य पळताणीसाठी होणारी गर्दी आणि लागणारा विलंब यामुळे पोलिसदलातर्फे ऑनलाईन अर्ज भरण्याची संकल्पना सामोर आली. वर्षाची सुरवात अधुनीकीकरणाने करीत पोलिस अधिक्षक कार्यालयानेही जिल्ह्यातील सर्वच चारीत्र्य पळताणी दाखल्यांसाठी ऑनलाईनचा अवलंब केला आहे. मात्र ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरही उमेदवारांना प्रत्यक्ष दाखला मिळवण्यासाठी अधिक्षक कार्यालयात यावेच लागत होते. येथे नियुक्त अधिकार्‍यातर्फे कामाचा ताण, वेबसाईट हॅक होत असल्याचे कारणे देत तत्काळ दाखला हवा असल्यास स्टेडीयम कॉम्प्लेक्सच्या….या सायबर कॅफेत पाठवण्यात येत होते.

कितीही घ्या मात्र आत्ताच द्या…
जिल्ह्यात नुकतेच ग्रामपंचायत,पंचायत समीतीसाठी अर्ज दाखल करण्यात आले, जिल्ह्यातून तब्बल चार ते साडेचार हजार दाखले या काळात वाटप करण्यात आले. चारित्र्यपळताणी दाखल्यासाठी उसळणारी गर्दी पाहता हातो हात दाखला मिळणे शक्यच नव्हते. म्हणुन येथील एका अधिकार्‍याने चक्क खासगी सायबर चालकाशी तोंडी टायप करुन घेतले. गर्दीत गोंधळ घालणारे..कितीही घ्या मात्र आत्ताच द्या अशी घाई असणार्‍यांना या सायबर कॅफेवर पाठवण्यात येत होते. तेथे पाचशे रुपयां पासुन ते थेट एक हजार रुपयां पर्यंत ज्यादा पैसे घेवुन दाखल्यांची प्रीट दिली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणू काळात दिलेली सर्व दाखले विना पैसे दिलेलेच नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

साबर कॅफेवर धाड
ग्रामपंचायत निवडणूकांत हौशे-नवशे गवशे अशा सर्वांनीच अर्ज दाखल केले, काहींनी डमी अर्ज दाखल करुन आपला रुबाब गावात दाखवला. परिणामी त्यांना दाखल्यासाठी हजार बाराशे मोजणे काही गैर वाटले नाही. पण राज्यपरीवहन मंडळावर बसचा चालक-कंडक्टरच्या नोकरीसाठी अर्ज भरलेल्या उमेवार मुळात गरीब त्यात नोकरीच्या शोधात म्हणुन पन्नास रुपये कुणाला देणे गैर वाटत असल्याने हे प्रकरण उघडकीस आले. अप्पर अधिक्षक मोक्षदा पाटील यांनाच थेट तक्रार होवुन आयपीएस अधीकारी निलोत्पल यांनी शुक्रवारी या साबर कॅफेवर धाड टाकून शेकडाच्या गणतीत अधीक्षक कार्यालयाच्या सही शिक्क्यानीशी दाखले ताब्यात घेतले.