ज्युनिअर कॅरम स्पर्धेत सिद्धांत, पुष्कर्णी अजिंक्य

0

मुंबई । सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम संघटना आणि नारायण शांताराम गोसावी चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे झालेल्या 53 व्या जुनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या 18 वर्षाखालील मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरने मुंबईच्याच रीतिकेश वाल्मीकीला 16-5, 21-6 असे सहज पराभूत करत विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अनुक्रमे उपांत्य लढतीत सिद्धांताने ठाण्याच्या खालिद शेखला 11-10,0-23,14-2 असे पराभूत केले. तर रीतिकेशने मुंबईच्या बशीर शेखला 19-15,7-22,20-16 असे हरविले. मुलींच्या 18 वर्षंखालील गटात अंतिम सामन्यात पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडने ठाण्याच्या नंदिता महाजनला 21-5,11-12, 16-9 असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकावले. उपांत्य सामन्यात पुष्कर्णीने रत्नागिरीच्या अपूर्वा नाचणकरला 5-6,13-5,17-5 असे पराभूत केले.

तर दुसर्‍या उपान्त्य लढतीमध्ये नंदिताने धुळ्याच्या मेहता पटेलला 3-7,7-1,13-3 असे नमविले होते. युथ मुलींमध्ये मुंबईच्या वैभवी शेवाळेने रत्नागिरीच्या मानली लिंगायतला तीन सेटमध्ये 7-9,11-5,7-6 असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकावले, तर युथ मुलांमध्ये अंतिम फेरीत मुंबईच्या शुभम सूर्यवंशीने मुंबईच्याच ओंकार नेटकेवर 17-1, 21-13 असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले.