ज्यूस सेंटरवरील कामगारांना हप्त्याची मागणी

0

कामगारांना चौघांकडून मारहाण

निगडी : ज्यूस सेंटरवर काम करणार्‍या कामगारांना हप्ता मागितला. कामगारांनी हप्ता देण्यास नकार दिल्यावरून कामगारांना मारहाण करून ज्यूस सेंटरची तोडफोड करण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास साने चौकात घडला. दीपक गिरे (वय 33, रा. चिखली, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साने चौकात गिरे यांचे धमाका ज्यूस सेंटर आहे. या ज्यूस सेंटरवर बपी इस्लाम शेख व केसरअली जुलमूत शेख हे दोन कामगार आहेत. शुक्रवारी रात्री अज्ञात चौघांनी ज्यूस सेंटरवर येऊन बपी आणि केसरअली यांना ‘इथे ज्यूसचे दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील’ अशी धमकी दिली. या मागणीला कामगारांनी विरोध केला असता चौघांनी मिळून दोघांना मारहाण केली. तसेच ज्यूस सेंटरची तोडफोड केली. बपी शेख यांच्या खिशातील दिवसभराच्या व्यवसायाचे तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.