भुसावळ । जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाच्या ज्या सभासदांच्या वैवाहिक जीवनास यशस्वीपणे 45 वर्षे पूर्ण झाले त्यांचा सत्कार करुन प्रतिविवाह स्वातंत्र्यदिनी लावण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फेस्कॉनचे अध्यक्ष डी.टी. चौधरी, जी.जी. चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, खंडेलवाल आदी उपस्थित होते. प्रथम संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते यांनी सपत्नीक गणपतीचा अभिषेक केला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते वधू-वरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर वरांची सनई चौघड्यांच्या मंगल वाद्यात मिरवणूक काढण्यात आली. वधू वरांना स्थानापन्न करून आंतरपाट धरण्यात आला. कार्यकारिणी सदस्यांनी मंगलाष्टके गायली. यानंतर संघाच्या महिला सवाष्ण सदस्यांनी वधू-वरांचे औक्षण केले. वधू-वरांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यानंतर वधू-वरांनी प्रतिनिधीक स्वरुपात आपापली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुणे व कार्यकारी सदस्यांनी
समयोचित मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ सोनवणे, अलका अडकर, विजय मांडाळकर, शांताराम बोवडे, नंदलाल पवार, अरुण मांडाळकर, मंगला वाणी यांच्यासह मंडळाच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले.