मुंढवा । प्रभात रस्त्यावरील वॉकिंग ट्रॅकवर दररोज सकाळी फिरण्यासाठी येणार्या मस्त ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला. बाळासाहेब गांजवे, रमेश कासट, रामदास गावडे, भाऊसाहेब कारंडे, भरत सुरेश जैन यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ती रोपे जगविण्याची शपथ या वेळी घेण्यात आली. कडुलिंब व सोनचाफ्याची शंभर रोपे यावेळी लावण्यात आली. शहरात काँक्रीटचे जंगल वाढत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. परिणामी, प्रदूषण वाढत असून ते कमी करण्यासाठी झाडे जगविणे गरजेचे आहे, असे कारंडे यांनी सांगितले.
डुकरांचा सुळसुळाट
पौड रस्ता : सुतारादर्यात डुकरांचा सुळसुळाट झाला असून, नागरिक वैतागले आहेत. कचरा रस्त्यावार पडत असल्याने डुक्कर, कुत्री, भटकी जनावारे तो कचरा अस्ताव्यस्त करतात. कचरा संकलन व्यवस्थित झाले तर डुक्कर व भटक्या जनावरंचा उपद्रव कमी होईल. परंतु महापालिकेने या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. डुकरांना अभय मिळाल्याने ते आक्रमक बनले आहेत. लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत. डुकरांचा व कचर्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संदीप कुंबरे यांनी केली आहे.