नवापुर । शहरातील महात्मा गांधी वाचनालय येथे जेष्ठ नागरीक संघ यांची मासीक सभा घेण्यात आली. यावेळी या सभेचे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश मावची हे होते. तर मंचावर संघटनेचे अध्यक्ष नगीनदास अग्रवाल,संघाचे सचिव श्रीकांत पाठक,उपाध्यक्ष शिरीष शाहा सहसचिव चिराग शेख,कोषाध्यक्ष उमाकांत खैरकर,विक्रम पाटील,नकुल वळवी,ईश्वर धोडीया,दिलीप दलाल,एन.जी जोशी,सोनार नाना,,प्रा.पमा सैय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.अविनाश मावची म्हणाले की, जेष्ठ नागरीकांच्या आरोग्याबाबत समस्या वाढत असतात. यामुळे आपल्या आहारात पोषक मुल्य यांचे संतुलन व्यवस्थीत ठेऊन आपली दिनचर्या व्यवस्थीत ठेवण्या बाबत जेष्ठ नागरीकांनी सैदव जागृत असावे असे आवाहन केले. यानंतर जेष्ठ नागरीक संघातर्फे जेष्ठ नागरीक एन.जे.जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर जेष्ठ नागरीक कवी शब्बीर राही यांनी शेरो शायरी सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत पाठक यांनी केले. यशस्वीतेसाठी महात्मा गांधी वाचनालयाचे ग्रथंपाल सुधिर सांळुखे,मुकेश सांगळे यांनी कामकाज पाहिले.