ज्येष्ठ नागरिकांनी संस्था रजिस्ट्रेशनसाठी सांगितले आणि त्याने करून आणले !

0

नवापूर । नवापूरच्या गांधी पूस्तकालयात जेष्ठ नागरिक संघ नवापूरतर्फे संस्थेच्या फलक अनावरणचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवापूरचे तहसिलदार प्रमोद वसावे तर प्रमुख पाहुणे नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत उपस्थित होते . यावेळी दोन्ही अधिकार्यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नगीनदास अग्रवाल व उपाध्यक्ष शिरीष शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, आमची संस्था रजिस्ट्रेशन होत नव्हती व मी सामाजिक कार्यकर्ते प्रा. पमा सैय्यद यांना संस्था रजिस्टेशन करून देशील का असे सांगितले. त्यांनी हो सांगितल्यावर आम्ही प्रा. पमा सैयदकडे हे काम दिले व पमाने अतिशय महेनत करुन 18 दिवसात संस्था रजिस्टेशन करुन दिली व प्रमाण पत्र आणून दिले अशी उत्कृष्ट कामगिरी करुन आमचा आत्मविश्वास वाढविला त्याकरिता आम्ही प्रा.पमा सैय्यदचा सत्कार करत आहोत. भावी वाटचालीसाठी शूभेच्छा ही देतो आहोत. यानंतर कार्यक्रमात तहसिलदार प्रमोद वसावे व पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, धीरू प्रजापत, हेमंत शहा यांनी मार्गदर्शन केले.

18 दिवसात संस्थेचे रजिस्ट्रेशन
जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिरीष शाह, नगीनदास अग्रवाल, धीरुभाई प्रजापत, प्रकाश पाटील, चिरागउद्दीन शेख, विक्रम पाटील, हरजन पाटील, रमेश पाटील, उमाकांत खैरकर, पाथारकर, दिलीप दलाल बाबा पाठक, बुधाजी पाटील,वसंत पाटील,पांडु पाटील,भरत गावीत, नकुल गावीत, हेमंत शाह यांनी ही मार्गदर्शन करुन संस्थेचे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रिडा शिक्षक ईकबाल पठाण, छोटु चव्हाण, सांगळे यांनी परिश्रम घेतले.नियित वयोमानानुसार आपल्या प्रदिर्घ सेवेतुन रिटायर झालेले मन, शरिर,व परिस्थीतीने थकलेले जेष्ठ नागरिक आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत. पेन्शन, योजना याकरीता कार्य करत असतांना अनंत अडचणी येत होत्या.आर्थिक परिस्थिती अभावी जेष्ठ नागरिक संघाचे रजिस्टेशन होत नव्हते. यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष शिरीष शहा यांनी शहरात सेवाभावी काम करणार्‍या पमा सैय्यद यांच्याकडे याबाबत सांगितले असता सैय्यद यांना आनंद झाला. आपल्या वडिलांच्या वयाचे सर्व जेष्ठ नागरिक यांचे काम करण्याचे पुण्य मिळाले. त्यांचे आशीर्वाद अनमोल आहेत असे सांगून त्यांनी 18 दिवसात संस्थेचे रजिस्टेशन करून प्रमाणपा आणुन दिले. यामुळे जेष्ठ नागरिकांना फारच आनंद झाला आहे.