ज्येष्ठ नागरिक संघातर्फे केले वृक्षारोपण

0

सदस्यांचा वाढदिवसानिमित्त उपक्रम

चिंचवडः लिंक रोड येथील मेट्रोपॉलिन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संघाच्या सदस्यांचा वाढदिवसानिमित्त रातराणी, तुळस, पारिजात अशी 25 झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमात ‘ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य शरद लुणावत, खुशाल दुसाणे, मदन प्रसाद, दत्तात्रय सोनवणे, जयंत क्षेत्रमाडे, मोहन खांडेकर, अशोक कर्नावट, अशोक नहार, डॉ. प्रताप कोठारी, वेणुगोपाळ नायर, रविंद्र शेटे, मधुकर वाघदरीकर, श्रीकांत आंबेकर, बबन बुरडे, महादेव देशमुख, शंकर सप्तगिरी आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सुभाष गरड, नरहरी भागवत, आनंद आफळे, बाकेलाल शर्मा व प्रकाश कदम यांच्या वाढदिसानिमित्त हे वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन खुशाल दुसाणे यांनी केले तर वृक्षारोपणाची माहिती सुभाष गरड यांनी दिली. शरद लुणावत यांनी आभार मानले.