ज्येष्ठ नागरीकांसाठी आयकर मार्गदर्शन कक्ष व घरपोच सेवा कार्यरत

0

जळगाव: आपल्या विविधोपयोगी सेवा सुविधांसाठी परिचित असलेल्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण सेवा सुविधांचे उद्घाटन शुक्रवार दि. 21 रोजी बँकेच्या ओंकारेश्वर मंदिर शाखेत संपन्न झाले यात ज्येष्ठ नागरीकांच्या आयकर विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापन करण्यात आली असून त्याच प्रमाणे वय वर्षे 75 व त्यावरील नागरिकांसाठी घरपोच सेवेचा शुभारंभ देखिल या वेळी करण्यात
आला.

या सेवेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना घरपोच बँकींग सेवा देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या आयकर विषयक शंकांच्या निवारण कक्षाचे उद्घाटन बी.एड. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य व ओंकारेश्वर शाखेचे ग्राहक प्रभाकर श्रावण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या घरपोच सुविधेचे उद्घाटन गणेश कॉलनी शाखेचे ग्राहक व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बँकेचे संचालक श्री सुरेश केसवाणी होते तसेच कार्यक्रमास बँकेचे संचालक श्री सतीश मदाने, संचालिका डॉ.सौ आरती हुजुरबाजार,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुंडलिक पाटील,विभागीय अधिकारी श्री कपिल चौबे,जळगाव शहरातील शाखाधिकारी तसेच ओंकारेश्वर शाखेचे ग्राहक व माजी सेल्स टॅक्स अधिकारी श्री जी.जी.चौधरी यांची व शाखेचे ग्राहक व सभासद यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुविधा बँकेच्या जळगाव शहरातील ओंकारेश्वर,गणेश कॉलनी,विवेकानंद प्रतिष्ठान,स्टेशन रोड तसेच भुसावळ,धुळे व अमळनेर या शाखांद्वारे उपलब्ध करून देण्यात
आल्या असून ज्येष्ठ नागरिकांना या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.