ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे यांना पुरस्कार प्रदान

0

धुळे । विदर्भातील समन्वयवादी ज्येष्ठ पत्रकार स्व. भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार व. सा. एकला चालो रे चे संपादक गो. पी. लांडगे यांना रविवारी नागपूर येथील रेशिम बाग येथील महर्षि व्यास सभागृहात मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री बावनकुळे, परिषदेचे अध्यक्ष एसेम देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विक्रांत इंगळे आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

साप्ताहिक एकला चालो रे चे संपादक
मानपत्र, स्मृतीचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पत्रकारिता करीत असतांना पुरोगामी चळवळीची कास धरत समाजवादी विचारांशी निष्ठा आणि स्वाभिमान व चारित्र्याची जपणूक करीत सतत तीस वर्ष सा. एकला चालो रे चालविल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान केल्याचे मराठी पत्रकार परिषदेने मानपत्रात नमूद केले आहे. नागपूर येथील या समारंभास धुळे राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ सैनिक माधवबापू गुरव, दिपकभाई परदेशी, रमेशनाना पवार, ए.ओ. पाटील सर, इकबाल शहा सर आदी साथी उपस्थित होते.