ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध

0

देहूरोड पत्रकार संघाने वाहिली श्रद्धांजली

देहूरोड : कर्नाटक, बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा देहूरोड पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. बाजारपेठेतील सुभाष चौकात गौरी लंकेश यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची शिक्षक दिनी बंगळुरू येथे अज्ञात तीन मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. शुक्रवारी सायंकाळी देहू-देहूरोड पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे, रामकुमार अगरवाल, सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाले, डॉ. राजेंद्र येळवंडे, सूर्यकांत सुर्वे, रमेश जाधव, बाळासाहेब जाधव, रवींद्र कदम, मिकी कोचर, दिलीप कडलक, अशोक गायकवाड, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य हाजीमलंग मारिमुत्तू, उमेश ओव्हाळ आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. देवराम भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. समीर शेख यांनी आभार व्यक्त केले. संदीप भेगडे, अनिस शेख, रमेश कांबळे, गणेश दुडम, बाबू कोरे, बबन पाटोळे, अमित छाजेड आदी उपस्थित होते.