जळगाव। येथील रहिवासी विजय मधुकर सरोदे ( वय 73) यांचे बुधवारी, 10 मार्च 2021 रोजी पहाटे 1 वाजता डॉ.उल्हास पाटील दवाखान्यात निधन झाले. ते ला.ना.शाळेतील माजी शिक्षक तसेच दै. ‘तरुण भारत’ला त्यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात एक लहान भाऊ, दोन पुतणे, दोन पुतणी, दोन सूना व नातवंडे असा परिवार आहे. ते जिल्हा बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र सरोदे यांचे ज्येष्ठ बंधू होत.