ज्येष्ठ पुरोगामी कार्यकर्ते पी.व्ही.मसुरे यांचे निधन

0

आंबेडकर पुतळा उभारणीत मोठा वाटा

पिंपरी-चिंचवड : शहरामधील पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर विठ्ठल मसुरे (वय 75) यांचे नुकतेच निधन झाले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकुती पुतळा 1994 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व महापौर विलास लांडे यांच्या हस्ते उभारण्यात आला. त्या पुतळा समितीचे मसुरे हे अध्यक्ष होते. 50 वर्षे सामाजिक कार्यात अग्रणी राहुन पिंपरी चिंचवड मध्ये फुले, शाहू, आंबेडकर चळवळ वाढविण्यात त्यांचा सहभाग होता.

भूमिहिनांना जमिनी मिळाव्यात. यासाठी त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच नामांतर लढयात त्यांना अटक झाली होती. देशभरातील बौध्द लेण्यांचे संवर्धन करावे. यासाठी देखील त्यांनी चळवळ उभारली होती. शुक्रवारी सायंकाळी पिंपरीत त्यांच्या अंत्यविधीस फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, शिक्षण, सामाजिक, राजकीय, पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, दोन मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.