ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

0

पुणे : भरघाव वेगातील स्कार्पिओने पाठीमागून दिलेल्या धडकेत कारमधील एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नव्या कात्रज बोगद्यामध्ये शुक्रवारी हा अपघात घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुमती कृष्णा पाटील (83, रा. लोकमान्यनगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मोटारचालक संजय पाटील (41, रा. शाहुनगर, कोल्हापूर) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक पाटील हे कारने कोल्हापूर येथे गेले होते. कोल्हापूरवरून इंदुमती यांच्यासह मुलगी सुरेखा काळे व जावई वसंत काळे कराने परत येत होते. त्यावेळी कात्रज बोगद्याजवळ त्यांना एका स्कॉर्पिओने ठोकर दिली. ही धडकी इतकी, भयानक होती की जगीच इंदूमती यांचा मृत्यू झाला. तर, तिघेही जखमी झाले. मात्र, स्कॉर्पिओ चालक अपघातानंतर तेथून पसार झाला. सहायक निरीक्षक एस. पी. यादव तपास करत आहेत.