मैत्री प्रस्तुत अभिकल्पना अभिव्यक्ती पुरस्कार सोहळा नुकताच प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीत पार पडला. यावेळी ज्येष्ठ लावणी कलावंत माया जाधव यांना पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ज्येष्ठ कवयित्री हिराताई बनसोडे यांना साहित्य क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लैला रामदास भटकळ यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिग्दर्शिका – अभिनेत्री आशा ज्ञाते यांना विशेष पुरस्काराने तर संगीता आणि कविता उमप या भगिनींना संगीत क्षेत्रातील योगदानासाठीच्या पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. उत्कर्षा बिर्जे स्मृती विशेष अभिवाचनात श्रीनिवास नार्वेकर, सुलभा सौमित्र, आशा ज्ञाते, शशी डंभारे आदींचा समावेश होता. यावेळी सत्यमेव जयते या अमीर खान यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख निर्याते सत्यजित भटकळ, लेखिका उर्मिला पवार आणि प्रा. आशालता कांबळे, अरुण शेवते, गजलकार भीमराव पांचाळे आदी उपस्थित होते.