ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन

0

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी(वय95) यांचे आज सकाळी निधन झाले आहे. दिल्लीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.राम जेठमलानी यांची देशातील नामवंत वकील आणि कायद्याचे अभ्यासक म्हणून ओळख होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते.वयाच्या 18 व्या वर्षी राम जेठमलानी यांनी वकीलीची पदवी मिळवली होती. अनेक नावाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी आरोपींचे वकील म्हणुन काम पाहिलेले आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांचा खटला जेठमलानी यांनी लढवला होता. 2017 मध्ये जेठमलानी यांनी वकिलीतून निवृत्ती घेतली होती. देशातील अनेक हाय प्रोफाईल खटले लढवण्याचं काम जेठमलानी यांनी केले आहे.अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात केंद्रीय कायदेमंत्री म्हणुनही त्यांनी काम पाहिले होते. आरजेडीकडून ते राज्यसभेत गेले होते.