भुसावळ- बुलढाणा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दिव्या फाउंडेशनच्या वतीने नुकताच दिव्यरत्न जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. त्यात महाराष्ट्रातील 25 समाजसेवकांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे ह्यांच्या प्रेरणेतून शेकडो एचआयव्हीग्रस्त बालकांचा सांभाळ करणारे करणारे ज्येष्ठ समाजसेवक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांच्या हस्ते युवा समाजसेवक रंजितसिंग राजपूत ह्यांना दिव्यरत्न युवा जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. राजपूत यांनी सामाजिक कार्यात अतिशय कमी वयात भरारी घेतली आहे. पर्यावरण संवर्धन, शहर स्वच्छता, विविध विषयांवर जनजागृती तसेच त्यांच्या संस्कृती फाउंडेशन च्या माध्यमातून राबविण्यात आलेले स्तुत्य उपक्रमांना एक पोहोच पावती त्यांना मिळाली आहे. कार्यक्रमास बुलडाणा जिल्ह्यातील माजी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, पोलि निरीक्षक यु.के.जाधव, महाराष्ट्रातील दंगल कवी नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती होती.