ज्योति पवारचे असलोद केंद्रांतर्गत स्पर्धेत यश

0

शहादा। तालुक्यातील दुधखेड़ा येथील श्री नागेश्वर विद्यलयातील इयता सहावीची विद्यर्थिनी ज्योति पवार हिने घवघवित यश मिळवले आहे. असलोद केंद्राअंतर्गत घेतल्या गेलेल्या बालचित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटाततीने तृतीय क्रमांक मिळवला.

याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी कौतुक केले. शिक्षण परिषदेत माणमोडया जिल्हा परिषद येथे तीचे केन्द्रप्रमुख एल. पी. परदेशी यांनी तिला चित्रकला वही, कलर बॉक्स, पेन्सिल पारितोषिक म्हणून दिले. चित्रकला शिक्षिका शारदा कुमावत व शिक्षक सुनील पाटिल यांनी तिला मार्गदर्शन केले.