ज्योती चव्हाण गटप्रवर्तक पुरस्काराने सन्मानीत

0

चाळीसगाव । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लक्षणीय कामगिरी केल्याबाबतची दखल घेवून तालुक्यातील दहीवद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्योती रत्नाकर चव्हाण यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट द्वितीय गटप्रवर्तक पुरस्काराने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते नुकतेच गौरवण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने आशा स्वयंसेवीका योजनेअंतर्गत सन 2016/2017 या वर्षात उत्कृष्ट काम केले म्हणुन दहीवद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्योती रत्नाकर चव्हाण यांना जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी बबीता कमलापुरकर यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.