ज्वारीसह मका खरेदीला मुदतवाढ ; शेतकर्‍यांमध्ये समाधान

0

रावेर बाजार समितीसह आमदारांच्या पाठपुराव्याला यश

रावेर– शासकीय ज्वारी व मका खरेदी केंद्रावर केवळ 31 डिसेंबरपर्यंत धान्याची खरेदी झाल्याने अनेक शेतकर्‍यांकडील धान्याची न झाल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत होती. खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्यासंदर्भात रावेर कृउबा सभापत नीळकंठ चौधरी व आमदार हरीभाऊ जावळे यांनी पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याला यश आले असून पुन्हा 16 जानेवारीपासून खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

खरेदी केंद्रे पुन्हा गजबजणार
शासनाने 31 डिसेंबर रोजी खरेदी थांबवल्यानंतर अनेक शेतकर्‍यांकडील धान्याची खरेदी रखडल्याने त्यांच्यात नाराजीची भावना होती मात्र खरेदी केंद्रास पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. 16 जानेवारीपासून खरेदी केंद्र सुरू होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी म्हणाले. 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन मका व ज्वारी खरेदीबाबत ज्या शेतकर्‍यांनी नोंदणी केल्या त्याच शेतकर्‍यांकडील धान्याची 16 जानेवारीपासून खरेदी करण्यात येणार आहे. तूर खरेदी केंद्रदेखील सुरू होणार आहेत. अधिकाधिक शेतकर्‍यांनी तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघात संपर्क करण्याचे आवाहन कृषी उत्पन बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले आहे.