ज्वारीसह मक्याच्या खरेदीसाठी दोन दिवसात नोंदणी करा

0

रावेर कृउबा सभापती चौधरी यांचे आवाहन

रावेर : ऑनलाईन नोंदणी करणार्‍या शेतकर्‍यांनी ताबडतोड दोन दिवसात नाव नोंदणी करावी तसेच त्यानंतर शासनाकडून मुदतवाढ नसल्याने नोंदणी होणार नाही, अशी माहिती बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी यांनी पत्रकार परीषदेत दिली.

शेतकर्‍यांनी ज्वारी-मका खरेदी केंद्रास 31 मार्चपर्यंत मुदत वाढ मिळावी यासाठी बाजार समिती तर्फे तहसीलदार, आमदार हरिभाऊ जावळे, गिरीष बापट यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला अद्यापही मुदतवाढ झाली नसल्याने शेतकर्‍यांनी तातडीने नोंदणी करावे, असेही चौधरी यांनी सांगितले. रावेर तालुका खरेदी-विक्री संघातर्फे आतापर्यंत 53 लाख रुपये किंमतीच्या व तीन हजार 721 क्विंटल मक्याची तर दोन लाख रुपये किंमतीच्या 161 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. प्रसंगी उपसभापती अरुण पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर विनोद चौधरी, सचिव गोपाळ महाजन, ग्रेडर प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.