ज्वारी-मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
भुसावळ : शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार ज्वारी-मका खरेदी केंद्राचा शुभारंभ सोमवारी दुपारी शहरातील तहसील कार्यालयाजवळील शासकीय गोदामात जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांच्या उपस्थितीत झाला. तब्बल 13 दिवस उशिरा का होईना जिल्ह्यात  पहिले केंद्र भुसावळात सुरू झाले तर नेहमीप्रमाणेच काटा पूजनालाही धान्य न मिळाल्याने केवळ वजनमाप काट्याचे पूजन करून खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. केवळ दोन महिने शासनाने धान्य खरेदीसाठी मुदत दिल्याने ती वाढवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मार्केटींग फेडरेशनचे माजी संचालक रवींद्र भैय्या पाटील यांनी मनोगतात दिली.
यांची होती कार्यक्रमास उपस्थिती
 कार्यक्रमास तहसीलदार विशाल नाईकवडे, नायब तहसीलदार संजय तायडे, पंचायत समिती सभापती सुनील महाजन, शेतकी संघाचे चेअरमन अनिल पाटील, राजू सूर्यवंशी, माजी सभापती संजय पाटील, गजू सरोदे, योगेश पाटील, पंढरी पाटील, संतोष सोनवणे, विलास देवकर, विजय झोपे आदी उपस्थित होते.. सूत्रसंचालन गणेश नवगाळे यांनी केले.