ज्वाला गुट्टा भारतीय संघाची प्रशिक्षक?

0

हैद्राबाद । आपल्या 18 वर्षांच्या बॅडमिंटन कारकीर्दीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारी महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा  लवकरच भारतीय संघाची प्रशिक्षक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील महिन्यात होणार्‍या ऑस्ट्रेलियन खुल्या सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार्‍या भारतीय बॅडमिंटन संघाबरोबर ज्वाला गुट्टा प्रशिक्षक म्हणून राहील, अशी माहिती मिळाली आहे. या संदर्भात ज्वाला गुट्टाने अधिक भाष्य करण्यास नकार दर्शविला. ज्वालाने अलिकडेच बॅडमिंटन अकादमीची स्थापना केली आहे. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्वाला आणि अश्विनी पोनाप्पा या जोडीने महिला दुहेरीचे सुवर्णपदक मिळविले होते.