झन्नामन्ना खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई

0

जळगाव – शहरापासून जवळच असलेल्या कानळदा रोडवरील झन्नामन्ना खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई करत त्यांच्याजवळील 13 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ जणांवरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, कानळदा रोड परीसरातील सुर्यवंशी यांच्या घराच्या भोवती असलेल्या मोकळ्या जागेवर काही लोक झन्नामन्ना खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शहर पोलीसांनी कारवाई करत आरोपी बापू रघुनाथ सुर्यवंशी (वय-42) शाहरूख शेख हमीद (वय-24), सलीम शेख गलमोहम्मद शेख (वय-48), शकुर खन गुफुर खान (वय-30), तिनही राहणार रा. गेंदालाल मिल, संदिप हिरामण शेवाळे (वय- 34) जळगाव विठ्ठल मंदीराजवळ, नितीन नगराज मराठे (वय-28) रा. दत्त कॉलनी गणेश कॉलनी परीसर, प्रदीप ज्ञानेश्वर पाटील (वय-21) रा. तुकारामवाडी पांडे चौक, राजू अशोक सपकाळे (वय-29) रा. शिवाजी नगर असे आठ जणांवर कारवाई केली असून त्यांच्या कब्जातील 13 हजार 400 रूपये रोख जप्त करण्यात आले आहे. आठही आरोपींविरोधात पोहेकॉ विजयसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.