झरीनने ठोठावले पोलिसांचे दार

0

मुंबई : बॉलीवूडमध्ये सतत काही न काही वादविवाद सुरूच असते. आता अभिनेत्री झरीन खानने आपल्या माजी मॅनेजर अंजलीविरोधात गैरवर्तनाची तक्रार दाखल केली आहे. अंजलीने आपल्याला धमकी देत मोबाईलवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचे झरीनने सांगितले.

तिला कामावरुन काढून टाकल्यानंतर तिने असे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली, असे झरीन म्हणाली. याविरोधात पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.