मुंबई । भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे 23 नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला असला तरी 27 नोव्हेंबरला मुंबईच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये ग्रॅड रिसेप्शनचे आयोजन केले होते. रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. सुष्मिता सेन, सुरेश रैना, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांसारख्या अनेक खेळाडूंनी आणि स्टार्सने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
मात्र विराट आणि अनुष्काचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. विराट आणि अनुष्काने रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली. रिसेप्शनला विराटने ग्रे रंगाचा सूट आणि अनुष्काने काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या लूकमध्ये दोघे अतिशय सुंदर दिसत होते. त्याचबरोबर विराट आणि अनुष्काने जबरदस्त डान्स केला. झहीर आणि सागरिकादेखील ठुमके लावले. या सर्वांना युवराज सिंग आणि हेजल कीच यांनीही साथ दिली. काही दिवसांपूर्वी विराटने झहीर खान आपला लव्ह गुरू असल्याचे सांगितले होते.
सागरिकाचा ’रॉयल लूक’
सागरिकाचा ड्रेस सब्यसाने डिझाइन केला होता. तिनं गोल्ड क्रीम रंगाचा खास बनारसी लेहंगा घातला होता. सोबत सागरिकाने सोन्याचे दागिने घातले होते. सागरिकाप्रमाणेच झहीर खानची शेरवानी निळ्या रंगांची होती. निळ्या कुडर्त्याला क्रीम रंगाचा चुडीदार घातला होता.