झाडांच्या दुर्घटनांवर मनपात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले

0

मुंबई । गेल्या वर्षभरात झाड अंगावर पडल्याने चार जणांना विविध दुर्घटनांनामुळे जीव गमवावा लागला. करदात्या मुंबईकरांचा जीव जातो याला प्रशासन जबाबदार असून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करा, अशी मागणी काँग्रसचे महापालिका विरोधी पक्ष नेते रविराजा महापालिका सभागृहात हरकतीच्या मुद्याद्वारे केली. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबियापैकी एका पालिकेच्या नोकरीत समावून घेत पाच लाखांची आथिॅक मदत करा, अशी मागणी करत प्रशासनाच्या बेजबाबदारीमुळे मुंबईकरांचे जीव जात असून प्रशासनाचा निषेध म्हणून सभा तहकूब करा, अशी मागणी रविराजा यांनी केली.

रविराजा यांच्या मुद्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत प्रशासनाला धारेवर धरले. दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे चार दिवसांपूवीॅ दिनेश सांगळे यांच्या अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला होता. वर्षभरात अशा चार घटना घडून चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एखादी घटना घडल्यावरच मुंबई महालिका प्रशासनाला जाग येते. दादर येथे जी घटना घडली ती जागा महापालिका प्रशासनाची आहे. ऑगस्ट 2017 मध्ये संभंधित संस्थेने हे झाड धोक्याच असल्याचे पत्र वुक्ष प्राधिकरणाला दिले होते. मात्र झाड पाडण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते मात्र पालिकेच्या विभाग कार्यालयाने केलेल्या दुर्लक्षामुळे सांगळे याला जीव गमवावा लागला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. हा मुद्दा गंभीर असून अशा घटना घडल्यावर मुत व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्या आणि यासाठी गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव आणून मंजूर करावा, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली.

एकूणच शनिवारी झालेल्या महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, नगरसेवकांच्या भावना तीव्र असल्याने सभा तहकुब केल्याचे महापैर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी जाहीर केले. मुंबईत पावसाळ्यापूर्वी जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक इमारतींची यादी केली जाते त्या धर्तीवर जुन्या झाडांची ऑडिट करण्यात यावे . यासाठी बॉटनी स्पेशालिस्ट ची नेमणूक करण्यात यावी अशी सूचना राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका सईदा खान यांनी केली. मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडतात, मात्र यावेळी खाजगी जागेत ही झाडे पडल्यास पालिका आपली जबाबदारी झटकते . मात्र परवा झालेल्या अपघातात पडलेले झाड हे जरी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या आवारात असले तरी , त्यांना ती जागा पालिकेने भाड्याने दिलेली आहे त्यामुळे त्याचे मूळ मालक पालिकाच असल्याने मयताच्या वारसांना मदत करणे हे पालिकेचे कर्त्यव्य आहे , असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाची पोलखोल केली.

सभागृहाची शोकांतीका
झाड पडूलकाझन एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पालिका सभागृहावर त्यावर चर्चा होते . मात्र हि वक्तृत्व स्पर्धा नाही त्यामळे पालिका प्रशासनाने ह्या चर्चेकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे मात्र प्रशासन उदासीन आहे . मुंबईतील खाजगी सोसायट्यांमधून कर घेतला जातो तर त्यांची जबाबदारी का घेतली जात नाही त्यामुळे खाजगी सोसायट्यांमधील धोकादायक फांद्या कापण्यासाठी पैसे घेणे चुकीचे असल्याचे भाजपच्या नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी सांगितले.