ऐरोली : पालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षांची छाटणी न केल्याने ऐरोली सेक्टर 17 मधील अभ्युदय बँक शेजारी असणार्या बस थांब्यावर बाजूलाच असणार्या सोसायटीच्या आवारातील एक झाडाची मोठी फांदी बस थांब्यावर पडल्याने बसथांब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणताच प्रवासी बस थांब्यावर नसल्याने मोठा अपघात झाला नाही. या संदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी सांगितले की, पावसाळ्यात नवी मुंबई शहरात धोकादायक असणार्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम चालू आहे. मनपाकडे वृक्ष छाटणीसाठी असणारे वाहन एकच असून येत्या काही दिवसात उर्वरित वृक्षांच्या फांद्यांची छाटणी लवकरच पूर्ण होईल. तर ऐरोली विभाग कार्यालयाचे उद्यान अधिकारी राजेंद्र पडवळ यांच्याशी सम्पर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.