झाडाच्या फांद्यांमुळे वाढला अपघाताचा धोका

0

मंचर । मंचर परीसरातून जाणार्‍या पुणे-नाशिक रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची वाहनांना अडचण होत आहे. या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये गुरफटल्या जाऊ लागल्या आहेत. रस्त्याने जाणारे कंटेनर, ट्रक, एसटी अशी मोठी वाहने झाडांची फांदी चुकविण्याच्या प्रयत्नात वाहने एका पट्ट्यातून दुसर्‍या पट्ट्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंचर, एकलहरे, कळंब गावच्या पुलाकडील पलीकडच्या बाजुला रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या जुन्या झाडांची येणार्‍या जाणार्‍या गाड्यांना मोठी अडचण होत आहे.

जुनी झाडे कोसळण्याची शक्यता

काही झाडे ही अतिशय जुनी आहेत. त्यामुळे येणारे-जाणारे प्रवासी, पादचारी, विद्यार्थी तसेच दिंडीच्या भाविकांच्या अंगावर वार्‍याने ही जुनी झालेली झाडे कोसळण्याची शक्यता आहे. तसेच येणार्‍या जाणार्‍या वाहनांवर पडून मोठी दुर्घटना होऊ शकते. या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये गुरफटल्या जाऊ लागल्या आहेत. या रस्त्याने जाणारे कंटेनर, ट्रक, एसटी अशी मोठी वाहने झाडांची फांदी चुकविण्याच्या प्रयत्नात एका पटट्यातून दुसर्‍या पट्ट्यात येऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फांद्या छाटण्याची मागणी

या ठिकाणावरील झाडांची वेळच्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने छाटणी करावी. अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. अनेक झाडे जुनी झाली असून ती केव्हा कोसळतील याचा नेम नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जुनी झालेली झाडे त्वरित छाटावी, अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावरील जीर्ण झाडे त्वरित काढून टाकावी. ज्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्या छाटून घ्याव्यात. भविष्यातील दुघर्टना टाळावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व नेतेमंडळी करताना दिसत आहे.