झाडाला दुचाकी धडकून युवकाचा मृत्यू

0

जळगाव । म्हसावद येथील युवक सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बोरनार येथे दुचाकीने चारा घेण्यासाठी जात होता. त्यावेळी रस्त्यात त्याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुनिंबाच्या झाडला धडकली. यात युवक झालावर आदळला गेल्याने त्याच्या चेहर्‍यावर गंभीर इजा झाल्या. त्यानंतर जखमी अवस्थेत युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषीत केले.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू
म्हसावद येथील श्यामू रामजी धोत्रे (वय 23) हा सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र. एमएच-20-9154) बोरनार येथे जात होता. त्यावेळी रस्त्यात जिभाऊंच्या मळ्याजवळ श्यामूचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर आदळली. या अपघाता श्यामूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी म्हसावद पोलिसांना कळविले. काही क्षणातच पोलिसांनी घटनास्थळ गाठत युवकाच्या नातेवाईकांना शामु याचा अपघात झाल्याचे कळविले. त्यानंतर श्यामु याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याला आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला. तर संतोषच्या पश्चात आई, वडील आणि चार भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे म्हसावद येथे शोककळा पसरली आहे.