झाडावर चढताना तरुणाचा पाय सरकला अन जिवाला मुकला : खडकदेवळ्यात शोककळा

A youth of Khadakdevla village died after falling from a tree पाचोरा : तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील 33 वर्षीय तरूणाचा झाडावर चढताना पाय घसरल्याने पडून दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रवींद्र वसंत महाडिक (33) असे मयत तरुणाचे नाव आहे.

लाकूड तोडताना दुर्घटना
खडकदेवळा शिवारात रवींद्र हे घरगुती वापरासाठी सरपण (लाकूड) तोडण्यासाठी गेल्यानंतर एका झाडावर चढले मात्र त्यांचा अचानक पाय सरकल्याने खाली पडले. रवींद्र महाडिक यांना ललित बाबू सुर्यवंशी यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. रवींद्र यांच्या पश्चात वृद्ध आई आहे.