झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शनाला तीन दिवसांत एक लाखाहून अधिक नागरिकांची भेट

0

नवी मुंबई । महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाने आयोजित केलेल्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शनाला तीन दिवसांत एक लाखाहून अधिक नागरिकांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, शिवाय झाडे, फुले, फळांशी संबंधित विविध 24 प्रकारच्या स्पर्धांमध्येही आबालवृद्ध नागरिक, महिला व संस्था, सोसायट्या, शाळा, उद्योगसमूह, रुग्णालये यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला. यामधील उद्यान स्पर्धेला नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभला असून, सहकारी गृहनिर्माण संस्थेची 500 चौ.मी.पेक्षा जास्त बाग स्पर्धेत सेक्टर 9 नेरूळ येथील आर्मी सोसायटी यांना प्रथम क्रमांक, सेक्टर 13 नेरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया सोसायटी व सेक्टर 18 नेरूळ येथील सागर दर्शन सोसायटी यांना द्वितीय क्रमांक विभागून तसेच सेक्टर 11 कोपरखैरणे येथील बालाजी गार्डन सोसायटी व सेक्टर 11 कोपरखैरणे येथील फाम सोसायटी यांनी तृतीय क्रमांक विभागून पारितोषिक प्राप्त झाले.

सहकारी गृहनिर्माण संस्थेची 500 चौ.मी.पेक्षा कमी आकाराची बाग स्पर्धा यामध्ये सेक्टर 29 घणसोली येथील यशोदीप हाइट्स सोसायटी यांना प्रथम क्रमांक, सेक्टर 5 ऐरोली येथील श्री संत सावता माळी मंडळ यांना द्वितीय क्रमांक तसेच सेक्टर 17 वाशी येथील कुबेर सोसायटी यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 500 चौ.मी.पेक्षा जास्त आकाराच्या शालेय बाग स्पर्धेत सेक्टर 52 नेरुळ येथील दिल्ली पब्लिक स्कूल हे प्रथम क्रमांकाचे तसेच 500 चौ.मी.पेक्षा कमी आकाराच्या शालेय बाग स्पर्धेत सेक्टर 2 ऐरोली येथील ज्ञानदीप विद्यामंदिर हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. 500 चौ.मी.पेक्षा जास्त आकाराच्या महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थेच्या बाग स्पर्धेत सेक्टर 7 नेरुळ येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तसेच सेक्टर 15अ वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. 500 चौ.मी.पेक्षा कमी आकाराच्या महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थेच्या बाग स्पर्धेत सेक्टर 5 नेरुळ येथील रामराव आदिक इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी यांना प्रथम क्रमांकाचे आणि से.1अ वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

500 चौ.मी.पेक्षा जास्त आकाराच्या रुग्णालय बाग स्पर्धेत सेक्टर 5 नेरुळ येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर यांना प्रथम क्रमांक, धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी, कोपरखैरणे येथील रिलायन्स कम्युनिकेशन यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. 500 चौ.मी.पेक्षा कमी आकाराच्या रुग्णालय बाग स्पर्धेत आरसीपी घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट आयटी पार्क लि. यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक लाभले. बाल्कनीतील खासगी बाग स्पर्धेत सेक्टर 19 नेरुळ येथील आरती अनरजित चव्हाण यांना प्रथम क्रमांक, नेरुळ येथील कांचन सुनील चव्हाण व घणसोली येथील मनिषा शरद पाटील यांना विभागून द्वितीय क्रमांक तसेच सेक्टर 9 ए वाशी येथील सय्यद मोहम्मद आलम यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गच्चीवरील बाग स्पर्धेत टी. टी.सी. इंडस्ट्रियल एरिया ऐरोली येथील के.रहेजा कॉर्प.माइंडस्पेस यांना प्रथम क्रमांक, आरसीपी घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट आयटी पार्क लि. आणि एमआयडीसी नॉलेज पार्क ऐरोली येथील के.रहेजा कॉर्प ग्रीगाप्लेक्स यांना विभागून व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. 5000 चौ.मी.पेक्षा जास्त आकाराच्या औद्योगिक परिसरातील बाग स्पर्धेत आरसीपी घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट आयटी पार्क लि. आणि टीटीसी इंडस्ट्रियल ऐरोली येथील के.रहेजा कॉर्प माइंडस्पेस यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून त्याचप्रमाणे एमआयडीसीमधील रिलायन्स लाइफ सायन्स प्रा.लि आणि टीटीसी इंडस्ट्रियल एरिया जुईनगर येथील के.रहेजा कॉर्प हर्डेलिया यांना विभागून व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी, कोपरखैरणे येथील रिलायन्स कम्युनिकेशन आणि टी.टी.सी एरिया तुर्भे येथील बी.ए.एस.एफ (इं) लि. यांना विभागून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.

स्वच्छतेसोबतच वृक्षप्रेम वाढवत नागरिकांनी पर्यावरणशीलता जपावी असे आवाहन
5000 चौ.मी.पेक्षा कमी औद्योगिक परिसरातील बाग स्पर्धेत एमआयडीसी नॉलेज पार्क ऐरोली येथील के.रहेजा कॉर्प, ग्रीगाप्लेक्स यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, आरसीपी घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट आयटी पार्क लि. व एमआयडीसी ठाणे येथील रिलायन्स लाईफ सायन्स प्रा.लि, यांना विभागून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच ऐरोली येथील सिमेन्स (आय) लि. आणि कोपरखैरणे येथील रिलायन्स कम्युनिकेशन, व टीटीसी इंडस्ट्रियल ऐरोली येथील के. रहेजा कॉर्प. माइंडस्पेस यांना विभागून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक लाभले. या उद्यान स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरात, परिसरात निसर्गप्रेमाने प्रेरित होऊन सुशोभित बाग फुलविणार्‍या नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले असून, त्यापासून इतर नागरिकांनी प्रेरणा घेऊन आपल्या परीने निसर्ग रक्षण, संवर्धन करावे, अशी अपेक्षा आहे. या प्रदर्शनातील स्टॉलमध्ये शून्य कचरा संकल्पनेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणारा एक विशेष स्टॉल लावण्यात आला होता. ज्यामध्ये नागरिकांनी ओला व सुका कचरा घरातच वेगवेगळा करण्याच्या पुढे जात घरातल्या ओल्या कचर्‍याचे वापरायला अगदी सहजसाध्या असलेल्या कचर्‍याच्या खत टोपलीचा वापर करून खतात रूपांतर करावे व त्या खताचा वापर करून आपल्या बाल्कनीत, गच्चीत, परिसरात किचन गार्डन फुलवावे, असे आवाहन करण्यात येत होते. आपल्या घरातला कमीच कमी कचरा घनकचरा प्रकल्पस्थळी वाहून नेण्याची गरज पडावी यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा शून्य कचरा संकल्पना राबवण्यासाठीच्या कार्यप्रणालीबाबतची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह याठिकाणी देण्यात येत होती. येथेही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेट देऊन शून्य कचरा संकल्पनेच्या माहितीचा लाभ घेतला. स्वच्छतेसोबतच वृक्षप्रेम वाढवत नागरिकांनी पर्यावरणशीलता जपावी, असे आवाहन महापौर जयवंत सुतार तसेच प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाला पोहोचणारी हानी टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी करत स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, सभागृह नेते रवींद्र इथापे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेत उल्लेखनीय ठरलेल्या संस्था, नागरिक यांना पारितोषिके प्रदान करत अभिनंदन केले.