मान्यवरांकडून गुरु-शिष्य परंपरेवर टाकला प्रकाशझोत
नंदुरबार । आदिवासी ज्ञानपीठ, नवापुर संचालित कुलदिपक माध्यमिक विद्यालय, झामणझर (ता.नवापूर) येथे गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व सरस्वती मातेच्या प्रतीमा पुजनाने झाली. यावेळी आर.बी.महिरे व एस.एस.वसावे यांनी गुरु-शिष्य परंपरेवर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एस.व्ही.बेहेरे म्हणाले की, जीवनाच्या जडण-घडणीत गुरुंचे उच्चदर्जाचे स्थान आहे. चारित्र्य, संस्कार व आदर्श जीवन मुल्यांची जपणूक गुरुंच्या सान्निध्यात होते. चांगल्या संस्कारातूनच सुजान नागरीक तयार होतो.
यशस्वितसाठी यांनी घेतले परिश्रम
भारतातील ऋषी मुनींचा गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी.वाघ यांच्या अनुमतीने करण्यात आले. सूत्रसंचालन पी.एम.नवरे यांनी केले. तर आभार पी.एस.कुवर यांनी मानलेत. कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.