मुंबई : आमिर खानच्या दंगल सिनेमात कुस्तीपटू गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका करणारी काश्मीरी अभिनेत्री झायरा वसीमशी विमानाची विमानात छेडछाड करण्यात आली. झायरा वसीमने इनस्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली. नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तारा एअरलाइनन्सने प्रवास करत असताना तिच्यासोबत एका सहप्रवाशाने असभ्य वर्तन केले.
विमानात जागेवर झायरा झोपलेली असताना तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या एक व्यक्तीने तीच्या जवळ त्याचा पाय ठेवला. तसेच तो झायराला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्नही करीत होता. या प्रकारामुळे झायरा घाबरुन गेली. हा प्रकार घडत असताना झायराने विमानाच्या क्रू मेंबर्सना माहिती दिली. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. या घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्नही तीने केला. मात्र, विमानातील अंधूक प्रकाशामुळे तीला ते शक्य झाले नाही. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते. त्या व्यक्तीच्या असभ्य वर्तनाबाबत माहिती देताना तिला रडू कोसळले. संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.