झारखंडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; दोन जवान शहीद

0

रांची: झारखंडची राजधानी रांची येथे नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. रांचीपासून जवळपास ४० किलोमीटर दूर जंगलात ही चकमक झाली. चकमकीत झारखंड जग्वारचे दोन जवान शहीद झाले, शिवाय अन्य जवानही जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रांचीचे एसएसपी अनीश गुप्ता, डीआयजी एवी होमकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जवानांना नक्षलवाद्यांच्या ठिकाण्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात शोधमोहीम राबवली जात होती.