रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीपासून झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीने बहुमताकडे वाटचाल केल्याचे दिसून आले. बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता असताना जेएमएम, कॉंग्रेस आघाडीने जवळपास ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. सकाळपासून झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीला बहुमत मिळताना दिसत होते. मात्र मध्यंतरी भाजपने मुसंडी मारली होती. परंतु आता पुन्हा भाजपचा आकडा खाली गेला असून आता भाजपने पहिला क्रमांकही गमविला आहे. बहुमत मिळत नसतानाही भाजप क्रमांक एकवर होते मात्र आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा क्रमांक एकचा पक्ष होताना दिसत आहे.
आताच्या आकडेवारीनुसार झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस आघाडीकडे ४५ जागांवर आघाडी आहे तर भाजपने फक्त २४ जागांवर आघाडी आहे. मागील निवडणुकीपेक्षा १३ जागांमध्ये भाजपचा पराभव होताना दिसत आहे. खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास पिछाडीवर आहेत.