रांची-झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एका वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी एका वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केली तर व्याज देण्याची गरज नसल्याचे जाहीर केले आहे. कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे.
मुख्यमंत्री जागतिक कृषी आणि खाद्य परिषदेत बोलत होते. दूध उत्पादनाला वाव देण्यासाठी ५० टक्के अनुदान दिले जाईल. महिलांसाठी डेअरी फार्मिग सुरु केले जाणार आहे. मुख्यमंत्री रघुबीर दास यांनी शेतकऱ्यांना फक्त शेतीवर अवलंबून राहू नका असे आवाहन केले.