नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार व झारखंड संघात विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे. ते दिल्लीतील व्दारका परिसरात असलेल्या वेलकम हॉटेलमध्ये उतरला होता. या वेलकम हॉटेलमध्ये शुक्रवारी सकाळी आग लागली.हॉटेलमधून महेंद्रसिंह धोनीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र झारखंड संघातील सर्व खेळाडूचे किट जळून खाक झाले.
तासाभरात आग आटोक्यात
विजय हजारे चषक स्पर्धेतील उपांत्य सामना 17 रोजी पासून झारखंड व बंगाल याच्या होणार होता.हा सामना चांगलाच अटीतटीचा होणार होता. दिल्लीतील द्वारका परिसरात वेलकम नावाचे हॉटेल असून या हॉटेलमध्ये महेंद्रस सिंह धोनी उतरला होता.धोनीसोबत झारखंडची संपूर्ण टीमही याच हॉटेलमध्ये थांबली होती. धोनी थांबलेल्या हॉटेल वेलकममध्ये 17 रोजी पहाटे अचानक आग लागली.पहाटे 6.30च्या सुमारास आम्हाला फोनवरून आगीबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच आम्ही 30 बंब घटनास्थळी पाठवले आणि 7.50 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आली’, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्याने दिली. हॉटेलमधून झारखंड संघातील क्रिकेटपटूंसह सर्वांनाच सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचेही त्याने सांगितले.
सामना शनिवारपर्यंत पुढे ढकलला
दिल्लीतील पालम मैदानात विजय हजारे करंडकातील उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. मात्र 17 हॉटेल वेलकममध्ये आग लागल्यामुळे झाारखंडच्या संघाची किट जळून खाक झाल्याने हा सामना शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.विजय हजारे करंडकात महेंद्रसिंह धोनीने झारखंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेल्या धोनीने संघातील खेळाडूंना मार्गदर्शनही केले आहे.