मुंबई: मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे काल रात्री निधन झाले. ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचे श्वास घेतले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी लागू यांनी विविधता आणि तेजस्वीपणा काय असतो हे आपल्या अभिनयामधून दाखवून दिले,” अशा शब्दांमध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रंगभूमीवरील लाडका नटसम्राट गमावला. झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!’ हा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. ट्वीटरवरून मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मोदींनी ट्विटवरुन लागू यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या अभिनकैशल्याचे कौतुक केले आहे. “वर्षानुवर्षे त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याचे काम कायम लक्षात राहील. त्यांचे निधन झाल्याचे समजल्याने अतिशय दुख: झालं आहे. माझी सहानुभूती त्यांच्या चाहत्यांसोबत आहे. ओम शांती,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
श्रीराम लागू यांनी मराठी चित्रपटांसह नाटकांतमध्ये देखील फार मोठे योगदान दिले आहे. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळ्याला लागू उपस्थित होते. सार्वजनिक जिवानामधील हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यामधील दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.