भुसावळ : झांशी रेल्वे स्थानकावर इंटरलॉकींगच्या कामामुळे प्रारंभ स्थानकापासून सुटणार्या दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून दोन गाड्यांच्या मार्गात परीवर्तन करण्यात आले आहे.
या गाड्या झाल्या रद्द, कंसात रद्द दिनांक
गाडी क्रमांक 12597 गोरखपूर-मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस (21 डिसेंबर), मुंबई-गोरखपुर एक्स्प्रेस (22 डिसेंबर), गाडी क्रमांक 12103 पुणे-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस (21 डिसेंबर), गाडी क्रमांक 12104 लखनऊ-पुणे एक्स्प्रेस (22 डिसेंबर), गाडी क्रमांक 11407 पुणे-लखनउ साप्ताहिक एक्स्प्रेस (21 डिसेंबर), गाडी क्रमांक 11408 लखनऊ-पुणे एक्स्प्रेस (16 व 23 डिसेंबर), गाडी क्रमांक 22121 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ साप्ताहिक एक्स्प्रेस (18 डिसेंबर), गाडी क्रमांक 22122 लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (19 डिसेंबर), गाडी क्रमांक 09465 अहमदाबाद-दरभंगा साप्ताहिक एक्सप्रेस (17 डिसेंबर), गाडी क्रमांक 22122 दरभंगा-अहमदाबाद एक्स्प्रेस (20 डिसेंबर) रोजी रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांच्या मार्गात परीवर्तन
गाडी क्रमांक 12144/12143 सुलतानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस -सुलतानपूर ही गाडी 21 डिसेंबर रोजी सुलतानवरून सुटणारी गाडी झांशी, ग्वाल्हेर, भिंड, ईटावा, कानपूरमार्गे वळविण्यात आली आहे तसेच गाडी क्रमांक 15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस ही 17, 18, 20 व 21 रोजी पनवेलवरुन सुटणारी गाडी झांशी, ग्वाल्हेर, भिंड, ईटावा-कानपूरमार्गे वळविण्यात आली आहे.