धनाजी नाना महाविद्यालयात ‘धनोत्सव 2017’ ला उत्साहात सुरुवात.
फैजपूर (निलेश पाटील)- तापी परीसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात रंगतरंग स्नेहसंमेलन धनोत्सवचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी, कैलोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, पदविका औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एम.बी.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
विधायक उर्जेचा समाजासाठी वापर झाल्यास देशाची प्रगती
बुधवारी मान्यवरांच्या हस्ते सलाद डेकोरेशन, रांगोळी, पोस्टर प्रदर्शन अश्या विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. प्रांताधिकारी गोडबोले म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा असून त्या विधायक ऊर्जेचा वापर समाज उन्नतीसाठी केल्यास देशाची प्रगती अधिक वेगाने होईल, असे ते म्हणाले.
आज बक्षीस वितरण समारंभ
गुरुवार, 8 फेब्रुवारी रोजी वार्षिक पारीतोषिक समारंभ माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्रसंगी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी यावर्षीचे धनोत्सव चेअरमन प्रा.डॉ.जी.एस.मारतळे, विद्यापीठ प्रतिनिधी स्वप्नील चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी, महाविद्यालय व्यवस्थापन, प्रशासन, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी परीश्रम घेत आहेत.
धनोत्सव 2017 आमच्या साठी फार मोठी पर्वणी आहे. आमच्या व्यक्तिमत्वाच्या उभारणीसाठी आणि कालागूणांना वाव मिळण्यासाठी हि सुवर्ण संधीच आहे.
स्वप्नील चौधरी, विद्यापीठ प्रतिनिधी
या वर्षी स्नेहसंमेलन प्रमुख म्हणून धनोत्सव 2017 ची जबाबदारी पार पडतांना मला विशेष आनंद होत आहे. महाविद्यालयाचा लौकिकात या आयोजनाने नक्कीच भर पडेल आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात उभारी येण्यास मदत होईल. मला व्यवस्थापन मंडळ, प्रशासन आणि सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर बंधूंचे सहकार्य मिळत आहे- प्रा डॉ – गोविंद मारतळे, धनोत्सव 2017 प्रमुख
धानोत्सवाच्या आयोजनासाठी महाविद्यालय पूर्णतया सज्ज झाले असून आभ्यासासोबतच सुप्त कलागुणाना मंच मिळवा या उद्देशाने स्नेहसमेलनात माझे विद्यार्थी उत्साहासोबत जबाबदारीचे भान ठेऊन उद्याचा सक्षम भारत घडविण्यासाठी तयार आहेत
-प्राचार्य डॉ पी आर चौधरी