‘झिरो’ सिनेमाचं ट्रेलर अखेर लाँच

0

मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या ५३ वा वाढदिवशी त्याच्या ‘झिरो’ या सिनेमाचं बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर आज लॉन्च झालं. हे ट्रेलर कधी लॉन्च होणार याची प्रत्येक सिनेप्रेमी आतुरतेनं वाट पाहात होता. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे.

शाहरुखचा ‘झिरो’ हा सिनेमा २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून यात त्याने एका बुटक्या नायकाची भूमिका साकारली आहे. टि्वटरवर त्याने हा ट्रेलर पोस्ट करताना म्हटलंय, ‘मीरत से निकला हैं, अतरंगी इसकी चाल हैं, कोई छोटी चीज ना समझना, ये बउआ तो बवाल हैं’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख सोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा एका हटके भूमिकेत दिसत आहे. कतरिना कैफदेखील या सिनेमात आहे.