झेंड्याचा अवमान करणार्‍या गुन्हेगारांवर कारवाईची मागणी

0

कास्ट्राईब संघटनेचे आमरण उपोषण

धुळे । एसटी महामंडळाच्या धुळे येथील विभागीय कार्यशाळेत एका समुदायाच्या झेंड्याची सातत्याने विटंबना होत असून गुन्हेगार शोधण्यात विभाग नियंत्रक अपयशी ठरत आहेत. परिणामी ते जुन्या केसेस उकरुन काढून संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्यायकारक कारवाई करीत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी. यासाठी कास्ट्राईब संघटनेने विभागीय कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात कार्याध्यक्ष बी.के.अहिरे यांच्या पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

४ ऑगस्ट रोजीही दिले निवेदन
एस.टी.महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत २०१३ पासून गैरकृत्य सुरु आहे. झेंड्याची सातत्याने विटंबना होत आहे. अशीच विटंबना ३ ऑगस्ट २०१७ रोजी झाल्याने ४ ऑगस्ट रोजी संघटनेने गुन्हेगार शोधण्याचे निवेदन दिले. तसेच १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्री व खात्यातील वरिष्ठांना निवेदन दिले. याचा राग आल्याने विभाग नियंत्रकांनी कास्ट्राईब संघटनेच्या दोंडाईचा आगारातून महिला वाहकांवर अन्यायकारक कारवाई केली. त्याविरोधात संघटनेने आवाज उठविताच विभाग नियंत्रकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. याचाच राग धरून विभाग नियंत्रक मागील केसेस उकरून काढून दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. शिवाय काहींना हाताशी धरून चुकीचे बडतर्फीचे आदेश काढले जात असून कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.