झेडपीची आढावा बैठक रद्द अन् कर्मचार्‍यांचा सुटकेचा निःश्‍वास

0

जळगाव । नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या उपस्थिती बुधवारी 6 रोजी जिल्हा परिषदेत आढावा बैठक होणार होती मात्र मुख्यमंंत्र्यांसोबत त्यांची बैठक निश्‍चित झाल्याने त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे आढावा बैठक रद्द ऐनवेळी रद्द करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना बैठकीसाठी बोलविण्यात आलेले होते. मात्र दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी कर्मचार्‍यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. आयुक्त यावेळी विविध विकास कामाचा आढावा घेणार होते तसेच प्रलंबीत कामकाजाबाबात विचारणाही करणार होते. त्यामुळे अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांमध्ये धडकी भरली होती. दौरा रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले.

प्रश्‍न कायम राहणार
दरम्यान जि.प.प्रशासनाने आढावा बैठकीसाठी केलेली सर्व तयारी फेल गेली. अखर्चीत निधीसह निधीसह सदस्यांकडून अभियंता, कर्मचार्‍यांना शिवीगाळ हे विषय ताजे असल्याने या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखर्चीत निधीचा प्रश्‍नांवरुन बैठक गाजणार होती. तसेच तोडगा निघण्याची शक्यता देखील होती मात्र आयुक्त बैठक रद्द झाल्याने प्रश्‍न तुर्त तरी कायम राहणार आहे. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे प्रथमच शहरात येणार होते. दरम्यान त्या अगोदर कांताई सभागृहात झिरो पेन्डन्सी या विषयावर कार्यशाळेत ते मार्गदर्शन करणार होते.