झेडपीची 18 रोजी सर्वसाधारण सभा

0

जळगाव । जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापतींची देखील निवड झाली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या दहा विषय समिती सदस्यांची निवड अद्याप बाकी आहे. आज मंगळवारी 18 रोजी होणार्‍या जिल्हा परिषदेच्या या पंचवार्षीकच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून यात ही निवड प्रक्रिया होणार आहे. तसेच पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने या सभेच्या अजेंड्यावर कोणतेच विषय नाही. सभेच्या अजेंड्यावर एकमेव विषय समिती सदस्य निवडीचा विषय आहे. तसेच आयत्यावेळी येणार्‍या विषयांचा यावेळी विचार केला जाणार आहे. आजपर्यत विषय समिती सदस्यांची निवडणुक ही बिनविरोध झाली आहे. मात्र निवडणुक घेण्याची वेळ आली तर प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. विषय समिती निवड सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभाग उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी कामकाज पाहणार आहे.
स्थायी व जलव्यवस्थापन समितीकडून जिल्हा परिषदेचे अति महत्वाचे विषय हाताळले जातात. त्यामुळे या समितीत सदस्यपद मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. पदाधिकार्‍यांचे समिती सदस्य पद देतांना कस लागणार आहे. भाजपाला सत्ता स्थापण्यासाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पाठिंबा देणार्‍या सदस्यांना महत्वाच्या समितीत पद मिळण्याची शक्यता आहे.