झेडपीतील विरोधी पक्षांच्या भूमिकेबाबत संभ्रमावस्था

0

गेेल्या अनेक वर्षापासून राज्यासह जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपा-शिवसेनेची युती तर कॉगे्रस राष्ट्रवादीची आघाडी होती. मात्र 2014 च्या विधानसभेच्या निवडणूकीतील जागावाटपावरुन चारही पक्षांचे बिनसल्याने त्यांनी वेगळ्य चुली मांडल्या. चारही पक्षांनी स्वबळावर सत्ता मिळविण्याचा नारा देत वेगळी निवडणूक लढविली. मात्र भाजपाला यात अंशतः यश आले. जळगाव जिल्हा परिषदेत भाजपाने पहिल्यांदा एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे झेडपीतील बाकी पक्ष विरोधी बाकावर बसले. विरोधकाची भुमिका नेहमी विरोधी असते. सत्ताधारी पक्षाला विविध विषयावरुन धारेवर धरणे हा विरोधी धर्म असतो. मात्र जिल्हा परिषदेतील प्रमुख विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला फारसा विरोध करत नसल्याचे चिन्हे आहेत. तर दुसर्‍या बाजुने खुद्द सत्ताधारी पक्षात दोन गट असल्याने सत्ताधारीच सत्ताधार्‍यांचा विरोध करत असल्याचे दिसते. सत्ताधारी असतांना देखील शालेय पोषण आहारातील गडबड भाजपाच्याच सदस्यांनी उकरुन काढला. याला भाजपातील गटबाजी जरी कारणीभुत असली तरी यातुन खरे वास्तव जनतेसमोर आले आहे. वास्तविक हे काम विरोधी पक्षाचे होते. तुर्त पोषण आहाराच्या मुद्यावरुन प्रमुख विरोधी पक्षांना उशीरा जाग आल्याचे दिसते. पोषण आहारावरुन सर्व वादंग उठून थंड झाल्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार यांनी या विषयी विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याची भूमिका जाहीर करत संबंधीत प्रकरणाच्या चौकशीची मागणी सीईओंकडे निवेदनावर केली आहे. शिवसेनेला देखील उशीरा जाग आली असून पाठीमागून पोषण आहाराला विरोध करत आहे. पोषण आहारातील गडबड भाजपाचे कुर्‍हा-सिम गटातील जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे सत्ताधारी भाजपाचे सदस्य विविध विषयांवरुन विरोध करत असून विरोधी पक्ष काय करीत आहे? असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे. बांधकाम समितीचे खातेवाटप देखील बेकायदेशीर करण्यात आले आहे. तसा ठपका देखील प्रशासनाने ठेवला आहे. हा मुद्दा तर विरोधी पक्षांसाठी विरोध करण्याचा आयता मुद्दा होता. चुकीच्या निवडीला विरोध होणे साहजीकच आहे, मात्र हे काम विरोधकांनी केले नसून खुद सत्ताधारींनी केले आहे. बांधकाम समितीच्या निवडीवरुन सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी सुरुवातील सीईओंकडे तक्रार केली. त्यानंतर नाशिक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली.

आयुक्तांकडून निर्णय देण्यास विरोध होत असल्याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरुन विरोधकांच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून सध्या तरी कायम आहे.
प्रदीप चव्हाण – 9503484491