झेडपीत आठवड्याभरात बैठकांचा सपाटा

0

जळगाव । जिल्हा परिषदेची निवड प्रक्रिया होऊन तीन महिने उलटले आहे. मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्व समित्या स्थापन करण्यात आल्या. निवडणुक प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेतील कामकाजांना बे्रक लागले होते. निवडणुक व समिती स्थापनेनंतर जिल्हा परिषदेच्या कामाला सुरुवात झाले आहे. पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेत बैठकांचा सपाटा लावण्यात आला असून विविध विभागाच्या बैठकीचे आयोजन या आठवड्यात करण्यात आले आहे. सोमवारी पासून बैठकीला सुरुवात होणार असून 1 जुन पर्यत दररोज विविध विभागाची बैठक होणार आहे. बहुतांश बैठका विविध कारणास्तव रद्द झाल्या आहेत.

कामांना येणार वेग
निवडणुकीमुळे जिल्ह्यातील विकास कामे अडुन पडली आहे. जिल्हा परिषदेतील बहुतांश सदस्यांसह सीईओ देखील नवनियुक्त आहेत. निवडणुकीमुळे मंदावलेल्या कामांना आता वेग येणार आहे. जि.प.ला स्वच्छ भारत, घरकुल योजनेंतर्गत लक्षांक देण्यात आले आहे. बैठकातुन अधिकारी यांच्यात समन्वय साधल्याने कामांना गती मिळणार आहे.

जि.प.च्या बैठका याप्रमाणे होणार
सोमवारी 22 रोजी केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची बदली प्रक्रिया, महाराष्ट्र राज्य विवाद धोरण लागू करणेबाबत समिती, जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना सभा, 23 रोजी ग्रामपंचायत सुनावण्या, नवीसजीवनी योजना आढावा बैठक, 24 रोजी मुख्य सचिव यांची व्ही.सी. कुपोषण, अमृत आहार योजनेबाबत, 26 रोजी स्थायी समिती सभा, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, 29 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास मंजुरी देणेबाबत, विविध संवर्गाच्या कर्मचारी संघटना तक्रार निवारण सभा, 30 रोजी विभागीय दक्षता व संनियंण समिती व्हि.सी., 1 जुन रोजी 4 कोटी वृक्ष लागवड कामांचा आढावा संबंधी बैठक आयोजित करण्यात आली आहे.