झेडपीत कक्षाधिकारी पदावर किशोर वानखेडे

0

जळगाव । जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील कक्षाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची नोटा बदली प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात आली होती. सीबीआय चौकशीमुळे त्यांची रावेर पं.स.त बदली करण्यात आली. तेव्हा पासून कक्षाधिकारी पद रिक्त होते. अखेर या ठिकाणी बदली प्रक्रियेद्वारे भुसावळ पं.स.किशोर विलास वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. विनंती अर्जाद्वारे ही बदली करण्यात आली आहे. या पदासाठी तीन अर्ज प्राप्त झाले होते. सोमवारी 15 रोजी जि.प. दोन पदासाठी इन कॅमेरा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयीन अधिक्षकपदी मुक्ताईनगर पं.स.तील गंगाधर वेडू जोशी यांची बदली करण्यात आली आहे. शिक्षण विभागातील प्रतिभा सुर्वे यांनी देखील या पदासाठी अर्ज केला होता मात्र त्यांची या ठिकाणी बदली करण्यात आली नाही. त्यांनी बदली प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.